पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सेना आघाडीसोबत जाऊ नये यासाठी भाजप प्रयत्नशील : पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण

राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले असताना भाजप-शिवसेना यांच्यात फुट पडल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपने सरकार स्थापनेमध्ये असमर्थता दर्शवल्यानंतर महायुतीतील शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांनी सत्ता स्थापनेसाठीच्या हालचाली सुरु केल्या आहेत. हा प्रयोग यशस्वी होऊ नये, यासाठी भाजप प्रयत्न करत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीवर बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. 

'उद्धव ठाकरेंची भेट हीच एक सकारात्मक गोष्ट'

राज्यातील सत्तास्थापनेत होणारा विलंब हा काँग्रेसमुळे होत नसल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. शिवसेना हा एनडीएचा घटक असेपर्यंत त्यांच्यासोबत चर्चा होणे अशक्य होते. ११ तारखेला शिवसेनेच्या केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर एकत्रित लढण्यासंदर्भातील मुद्यावर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. शिवसेनेसोबत जाण्यासंदर्भात काही मतभेद निश्चित होते. पण एकसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. 

काँग्रेस नेत्यांसोबत योग्य दिशेने चर्चा सुरु: उद्धव ठाकरे

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबतच्या व्यापक चर्चेनंतर शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत पक्के ठरले होते. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्ल्यामुळेच शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र दिले नाही, असा गौफ्यस्फोटही त्यांनी केला. उल्लेखनिय आहे की, राज्यपालांचे निमंत्रण मिळाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या भरवशावर आदित्य ठाकरे आणि सेनेचे प्रमुख नेते विधानभवनात दाखल झाले होते. मात्र पाठिंब्याचे पत्र सादर न करु शकल्याने त्यांनी मोकळ्या हाती परतावे लागले होते. पाठिंबा दिल्यानंतर सरकार स्थापन करताना चर्चा करणे योग्य नव्हते. त्यामुळे हा सर्व प्रकार वेळ ढकलण्यापुरता आहे असे म्हणता येणार नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले.