पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लातूरमध्ये धीरज देशमुखांनी 'नोटा'ला हरवले

लातूरमध्ये धीरज देशमुख विजयी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. तर दुसरीकडे लातूरमध्ये एक वेगळेच समीकरण पहायला मिळाले आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील जनतेने 'नोटा'ला सर्वाधिक पसंती दिली असल्याचे चित्र समोर आले आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख विजयी झाले आहेत. तर धीरज देशमुख यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 'नोटा' होते. धीरज देशमुखांनंतर लातूरकरांनी सर्वाधिक 'नोटा'ला मत दिल्याचे चित्र समोर आले आहे.  

आमचे डोळे उघडणारा जनादेशः उद्धव ठाकरे

लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील २७ हजार २८७ लोकांनी नोटाचे बटन दाबले. या मतदार संघात दिवंगत विलासराव देशमुख यांचे सुपुत्र धीरज देशमुख यांना १ लाख ३३ हजार १६१ मतं मिळाली. धीरज देशमुख हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी दणदणीत विजय मिळवला. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून धीरज देशमुख हे आघाडीवर होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर नोटा चालत होते. धीरज देशमुखांसाठी त्यांचे धाकटे बंधू आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी जोरदार प्रचार केला होता. या मेहनतीला अखेर यश आले.

एक नव्हे दोन चंद्रकात पाटील विधानसभेत