पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

छत्रपतींच्या, आई-वडिलांच्या नावानं शपथ घेणं गुन्हा नाहीः उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर आभार मानताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. आजचे विधानसभेतील कामकाज पाहिल्यानंतर यापेक्षा मैदान चांगले आहे, असा टोला त्यांनी लगावला. मी समोरासमोर लढणारा आहे. शत्रूंना अंगावर घेणारा आहे. पण इथे कोणी शत्रू नाही. 

'आम्ही १६९'!, महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकला

मी छत्रपतींच्या नावाने, आई-वडिलांच्या नावाने शपथ घेतली, तो गुन्हा नाही. गुन्हा असेल तर तो पुन्हा पुन्हा करेन. जो आपल्या दैवताला मानत नाही. तो जगायच्या लायकीचा नाही, असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला. 

अधिवेशन नियमांना धरुन होत नाही: फडणवीस

सुरुवातीला ते म्हणाले की, या सभागृहात येणे हे मी माझे भाग्य समजतो. यासाठी सभागृहाचे आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. आपल्याला अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे, असेही ते म्हणाले.

तिन्ही पक्षांकडून संविधानाची पायमल्ली, फडणवीसांचा आरोप

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Yes I took oath in name of Chhatrapati Shivaji Maharaj and also in name of my parents says CM Uddhav Thackeray in assembly