पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आदित्य यांच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंची 'मन की बात'

आदित्य ठाकरे- उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची औपचारिक घोषणा केली.  या परिषदेदरम्यान उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे हे पुढचे मुख्यमंत्री होतील का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी पुढचा मुख्यमंत्री हा सेनेचा असेल असं शिवसेना म्हणाली होती. तेव्हापासून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होतं.   

माघार घेतली नाही तर जागा दाखवू, मुख्यमंत्र्यांचा बंडखोरांना इशारा

'आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं असं स्वप्न शिवसैनिक पाहत असतील तर त्यात काहीच गैर नाही. मात्र आदित्यला काय हवंय ते विचारा. मुख्यमंत्री कोणाचा असण्यापेक्षा या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम झालेला आदित्यला पाहायचा आहे. राजकारणात पहिलं पाऊल ठेवल्यावर लगेच मुख्यमंत्री व्हायचं हे गरजेचं नाही. त्यानं आता राजकारणात प्रवेश केला आहे ही सुरूवात आहे', असं उद्धव ठाकरे म्हणाले.

वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात

गुरूवारी आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील पहिलेच सदस्य आहेत जे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज  भरल्यानंतर शिवसेनेतर्फे  शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांना दिलेल्या  प्रतिक्रियेत मला कोणत्याही पदामध्ये रस नाही, मला जनतेची सेवा करायची आहे, असं ते म्हणाले  होते. 

शरद पवारांचे नातू रोहित पवारांची संपत्ती ६५ कोटी

दरम्यान पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ते नक्कीच बहुमातानं वरळी मतदारसंघातून विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.