पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून राज्यात शिवसेना छोट्या भावाची भूमिका निभावण्यास तयार

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती जाहीर झाली आहे. त्यानंतर भाजपने आपली १२५ जागांवरील उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली. दुसरीकडे शिवसेनेनेही ६८ जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर केली. युती असली तरी या निवडणुकीत भाजप शिवसेनेपेक्षा जास्त जागांवर लढणार हे जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे तूर्ततरी शिवसेना छोट्या भावाची भूमिका निभावणार असल्याचे दिसून येते आहे. त्या पार्श्वभूमीवर यामागील कारणांचा घेतलेला वेध...

राज्यातील बदललेली परिस्थिती
गेल्या पाच वर्षांत राज्यातील परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला असल्याचे शिवसेनेला जाणवले आहे. भाजप केवळ शहरी भागातील पक्ष राहिलेला नाही. ग्रामीण भागातही भाजपने आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढण्याचा शिवसेनेला फारसा फायदा झाला नव्हता.

शिव वडापाव नाही तर खमंग ढोकळा घ्या; आदित्य ठाकरेंवर टीकेची झोड

विरोधक एकत्र
गेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. पण त्यावेळी राज्यात विरोधकही स्वतंत्रपणे लढले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना सगळे स्वतंत्रपणे लढले होते. पण यावेळी विरोधकांसाठी ही लढाई जास्त महत्त्वाची आणि अस्तित्त्वाची लढाई आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी करून निवडणूक लढविण्याचे निश्चित केले आहे. अशावेळी शिवसेना स्वतंत्रपणे लढून फार फायदा होणार नाही. 

कौटुंबिक प्रतिष्ठा
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यावेळी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे ठाकरे कुटुंबातील ते पहिलेच सदस्य आहेत. आता शिवसेनेमध्ये युवा नेतृत्त्वाला संधी मिळणार असल्याचे पक्षाला दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी आदित्य ठाकरे निवडणुकीला उभे राहात आहेत. भाजपशी युती केली तरच आपल्याला जास्तीत जास्त यश मिळवता येईल, हे शिवसेनेलाही माहिती आहे. 

इस्रोतील शास्त्रज्ञांची हैदरबादमध्ये हत्या

कार्यकर्त्यांचे बळ वाढविणे
गेल्या पाच वर्षांतील सत्तेमुळे भाजपचे कार्यकर्ते सध्या जोशात आहेत. अशावेळी शिवसेनेला भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये काहीशी नाराजी आहे. त्यामुळेच पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच या मुद्द्यावर पक्ष प्रचार करतो आहे. जेणेकरून शिवसैनिकांना बळ मिळेल आणि जागा कमी मिळाल्या असल्या तरी जास्त जागांवर पक्ष विजय मिळवून आपला स्ट्राईक रेट भाजपला दाखवून देईल.