पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून प्रियांका गांधींनी महाराष्ट्रात प्रचार केला नाही

प्रियांका गांधी

सोमवारीच मतदान झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सहभाग घेतला नव्हता. प्रियांका गांधी यांनी महाराष्ट्रात एकही प्रचारसभा घेतली नाही किंवा रोड शो केला नाही. त्यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. प्रियांका गांधी सध्या उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्षाचा पाया मजबूत करण्यावर भर देत आहेत. त्यांचे संपूर्ण लक्ष उत्तर प्रदेशात काँग्रेसचा विस्तार करण्यावर आहे. त्यामध्येच गुंतल्याने त्यांनी महाराष्ट्रात प्रचार केला नाही, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

INX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना जामीन, पण तूर्त सुटका नाही

प्रियांका गांधी उत्तर प्रदेशात काँग्रेसची पुनर्रचना करण्यावर आणि राज्यातील काँग्रेसला नवसंजीवनी देण्यावर भर देताहेत, असे या नेत्याने सांगितले. १९८९ मध्ये पराभूत झाल्यानंतर हळूहळू उत्तर प्रदेशात काँग्रेसची अवस्था बिकट होत गेली आहे. देशाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस केवळ नावापुरती उरली असल्याची स्थिती आहे. त्यामुळे या राज्यात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रियांका गांधी तिथे जास्त लक्ष देत आहेत, असे या नेत्याने सांगितले. 

तेजस एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या चाळ्यांनी हॉस्टेस वैतागल्या

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ अमेठीतून पराभूत झाले होते. या ठिकाणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी विजयी झाल्या होत्या. काँग्रेसला केवळ रायबरेली मतदारसंघात विजय मिळाला होता. या मतदारसंघातून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी विजयी झाल्या होत्या.