पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

३७१ कलमाबद्दलही बोला, शरद पवारांचा भाजपला प्रश्न

शरद पवार

३७० कलम रद्द केले त्याचे स्वागतच आहे. आम्ही त्याला कधीच विरोध केला नाही. पण ३७१ कलमाचे काय, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी शिरूरमधील सभेत उपस्थित केला. ३७१ कलमामुळे आमच्याकडील शेतकऱ्यांना नागालँड, मेघालय, मणिपूर अशा ९ राज्यांमध्ये जमिनी विकत घेता येत नाही. त्याबद्दल का बोलत नाही, असा प्रश्न त्यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारला विचारला.

संजय राऊतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सानपांची घेतली भेट

३७० कलम रद्द करण्याला आम्ही कधीही विरोध केला नाही. हवे असेल तर संसदेचे रेकॉर्ड तपासा. आमचे फक्त एवढेच म्हणणे होते की असा निर्णय घेण्याआधी काश्मीरमधील जनतेला विश्वासात घ्या, असे सांगून शरद पवार यांनी ३७१ कलमाचा मुद्दा उपस्थित केला. घटनेमध्ये ३७१ कलमही आहे. या कलमामुळे मेघालय, मणिपूर, नागालँड अशा नऊ राज्यांमध्ये इतर कोणालाही जमिनी विकत घेता येत नाही. त्या कलमाबद्दलही बोला, असे शरद पवार म्हणाले.

कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्यांच्या संस्थांवर छापे; ४.५२ कोटी जप्त

पाकिस्तानमधील सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटत आहेत, असे सांगून शरद पवार म्हणाले, पाकिस्तानमध्ये घुसला कोण आमचा सैनिक, आमच्या सैनिकामध्ये जबरदस्त ताकद आहे आणि त्याचे श्रेय कोण लाटतंय ते पाहा. म्हणतात ना करून गेला गाव आणि भलत्याचेच नाव, अशी टीका शरद पवार यांनी केली.