पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सत्ता संघर्ष : अंतिम निर्णयाबाबत भाजपने दिली ही वेळ!

सुधीर मुनगंटीवार (HT Photo by Pratik Chorge)

राज्यातील सत्तास्थापनेबाबत राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणानंतर भाजप काय निर्णय घेणार? याबाबत राज्यातील जनतेला थोड्याच वेळात माहिती देऊ असे  भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. सत्तास्थापनेबाबत निर्णय घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी भाजपची कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजप आपला निर्णय जाहीर करेल, अशी अपेक्षा होती. मात्र सत्ता स्थापनेसंदर्भाती भूमिका मांडण्यासाठी आणखी थोडा वेळ प्रतिक्षा करा, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.  

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातील विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. घटनेनुसार राज्यपाल महोदयांनी आम्हाला सत्तास्थापनेसाठी  निमंत्रण दिले आहे. यासंदर्भात आम्ही सविस्तर चर्चा केली. ४ वाजता आम्ही पुन्हा एकदा चर्चेला बसणार आहोत. या बैठकीनंतर आम्ही प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून जनतेसमोर आमची भूमिका मांडू, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. 

 

'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे राज्याची गरज', मातोश्रीबाहेर होर्डिंग

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र भाजप-शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीमुळे सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. भाजपचे कार्यवाहू  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच सत्तास्थापनेवर भाजप ठाम आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळावे यावर शिवसेनापक्षप्रमुख आग्रही आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: we will meet at 4 pm again today and take the decision on Governors invitation Sudhir Mungantiwar says after BJP Core Committee meeting at the residence of Devendra Fadnavis