पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'उद्धव ठाकरेंची भेट हीच एक सकारात्मक गोष्ट'

काँग्रेस नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली (Photo by Satish Bate)

शिवसेनेसोबत चर्चा सुरु होणे हीच एक सकारात्मकता आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ट्रायडंट हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये तब्बल पाऊण तास चर्चा झाली. ही एक सदिच्छा भेट होती, असे सांगत या भेटीतील चर्चेमध्ये नेमके काय बोलणे झाले यावर बाळासाहेब थोरात आणि इतर काँग्रेस नेत्यांनी मौन बाळगले. आम्ही सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे आणि अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. 

पुढचं पाऊल, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून समन्वय समितीची स्थापना

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्याबाबत ते म्हणाले की, पहिल्यांदा काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये एकत्रित चर्चा होईल. किमान समान कार्यक्रमाबाबत विचार केला जाईल. त्यानंतर  शिवसेनेसोबत चर्चा केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गुरुवारी मुंबईत बैठक पार पडेल, अशी माहिती देखील त्यांनी दिली. 

मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीसांची नवी ओळख महाराष्ट्राचा

विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. पण मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरुन भाजप-शिवसेना यांच्यात दरी निर्माण झाली. शिवसेनेशिवाय भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्यात अपयशी ठरले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. मात्र राज्यपालांनी दिलेल्या अल्पवेळेत त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादाची पाठिंब्यासंदर्भातील पत्र राज्यपालांसमोर सादर करण्यात अपयश आले. परिणामी शिवेसनाही सत्तास्थापनेत अपयशी ठरली. तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीलाही सत्तास्थापनेचे निमंत्र देण्यात आले. त्यांनी वेळ वाढवून मागितल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.