पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फडणवीसांना मुख्यमंत्री करुन दाखवा, राऊतांचे भाजपला चॅलेंज

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत

जर भाजपकडे बहुमत असेल तर त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा करावा, अन्यथा सरकार स्थापन करत नसल्याचे जनतेला स्पष्टपणे सांगावे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. भाजपने २०१४ ला जो प्रयोग करण्याचा प्रकार केला तो यावेळी शक्य नाही, असेही ते म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांसोबतच्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेच्या मुख्यमंत्री होणार अशी ठाम भूमिका घेणाऱ्या संजय राऊत यांनी बहूमत सिद्ध करुन देवेंद्र फडणवीस यांना भाजपने मुख्यमंत्री करुन दाखवावे, असे आव्हानही यावेळी दिले.  

शिवसेनेच्या ठाम भूमिकेवर भाजपचे मौन

आम्ही स्थिर सरकार देऊ असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. राज्यपालांच्या बैठकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महायुतीला जनादेश मिळाल्याचे म्हटले होते. महायुती म्हणजे फक्त भाजप नव्हे यात शिवसेना आणि इतर पक्ष आहेत. साम दाम दंड भेद हा सत्तेचा माज असतो. सत्ता गेल्यानंतर तो गळून पडतो, अशा शब्दांत त्यांनी भाजपला टोला लगावला. भाजपच्या अडमुठेपणामुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. भाजप राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही राऊत यांनी  केला आहे.  

उद्धव ठाकरे म्हणतात, मला स्वतःहून युती तोडायची नाही पण...

शिवसेना पक्षप्रमुख पहिल्यापासून आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शिवसेनेच्या भुमिकेत कोणताही बदल झालेला नाही. राज्याच्या हितासाठी उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील त्याला  सेनेच्या आमदारांनी पाठिंबा दर्शवला आहे, असेही ते म्हणाले. आमच्याकडून युती तोडण्याचे पाप मी करणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. मात्र शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी आमच्याकडे इतर पर्याय अजूनही खुले असल्याचे ते म्हणाले. भाजपने आपला गटनेता म्हणून फडणवीसांची निवड केली आहे. आता त्यांनी राज्यपालांसमोर १४५ संख्याबळ दाखवून त्यांनी मुख्यमंत्री करुन दाखवावे, असे आव्हानच त्यांनी भाजपला केले आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: We have the numbers to make our own Chief Minister Shiv Sena leader target bjp anc cm devendra fadnavis