पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बकवास' हाच संजय राऊत यांच्यासाठी योग्य शब्दः गिरीश महाजन

गिरीश महाजन HT photo by Bhushan Koyande

पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून शांत असलेले भाजपचे नेते आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती शब्दांत टीका केली आहे. संजय राऊत यांच्यासाठी 'बकवास' हीच उपमा योग्य आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. संजय राऊत यांच्या असल्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनाही नैराश्य आले होते, अशी टीकाही त्यांनी केली.

राज्यात भाजप-राष्ट्रवादी बंडखोर गटाचं नवं सरकार

शनिवारी सकाळी राज्यात नाट्यमय घडामोडी घडल्या आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. स्थिर सरकारसाठी एकत्र आल्याचे दोघांनी सांगितले आहे. पण तिकडे सध्यातरी राष्ट्रवादीच्या वतीने हात वर करण्यात आले आहे. 

याचदरम्यान, गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्या डॉयलॉगबाजीमुळे सर्वंचजण त्रस्त असल्याचे म्हटले. रोज सकाळी उठल्यानंतर त्यांची तीच ती वक्तव्ये ऐकून शिवसेनेचे आमदारही वैतागले होते. त्यामुळे त्यांचे काही आमदारही आमच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले.