पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वंचित बहुजन आघाडी २८८ जागा लढवणार; उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी सोमवारी जाहीर झाली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी १२० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असल्याचे सांगितले आहे. मात्र माध्यमांसमोर आलेल्या यादीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या फक्त १११ उमेदवारांची नावं आहेत. तर याआधी वंचित बहुजन आघाडीने २२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी २८८ जागा लढवणार असून उर्वरीत उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. 

होय, मी निवडणूक लढवतोय - आदित्य ठाकरे

दरम्यान, 'त्यांनी गोपिचंद पडळकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गोपीचंद हे लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीमध्ये आले होते. ही प्रक्रिया चालूच राहणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी पडळकर भाजपमध्ये गेले आहेत. मला अशी अपेक्षा आहे की विधानसभा निवडणुक झाल्यानंतर ते परत आमच्याकडे येतील', असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.

अजितदादांविरोधात मुख्यमंत्री ढाण्या वाघाला मैदानात उतरवणार

'शिवसेना-भाजपची ताकद कमी करायची असेल तर जे जे त्यांना सोडून येतीला त्यांचा आम्ही स्विकार करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसंच, 'मी सगळ्या राजकीय पक्षांना चॅलेंज देतो की त्यांनी त्यांच्या ताकदीवर २८८ जागा लढवून दाखवाव्यात. मैत्री करता याचा अर्थ तुमची महाराष्ट्रभर ताकद नाही. काही जिल्ह्यांपूर्ती त्यांची ताकद असल्यामुळे ते एकमेकांच्या मदतीने लढत आहेत.' असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.  

शिवस्मारक प्रकल्पात कोट्यवधीचा घोटाळा : काँग्रेस