पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेने छत्रपतींची भाषा बोलू नये, रविशंकर प्रसाद यांची टीका

रविशंकर प्रसाद

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होऊन शनिवारी अचानक सकाळी आठ वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन खळबळ उडवून दिली. त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावरुन शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना कोणाच्या जीवावर इतकी उत्तेजित कशी झाली होती, असा सवाल करत हा निकाल भाजपचा नैतिक आणि राजकीय विजय असून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार महाराष्ट्राला स्थिर सरकार देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेने छत्रपतींची भाषा बोलू नये असेही ते म्हणाले.

अजित पवारांना 'ब्लॅकमेल' केलंय, संजय राऊत यांचा आरोप

रविशंकर प्रसाद हे दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, मुंबई हे महाराष्ट्रातले मोठे शहर आहे. देशाची ती आर्थिक राजधानी आहे. या शहरावर राज्य करण्यासाठी चोर मार्गाने प्रयत्न सुरु होते. विरोधात बसायचे होते तर मग खुर्चीसाठी मॅच फिक्सिंग का केली, असा सवाल त्यांनी केला.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना बहुमत चाचणी जिंकणार: अहमद पटेल

बाळासाहेबांचे आदर्श न ठेवणाऱ्यांना काय बोलणार, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. त्याचबरोबर शिवसेनेने छत्रपतींची भाषा बोलू नये असेही ते म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध सर्वश्रूत आहे. त्यांनी आयुष्यभर काँग्रेसला विरोध केला. बाळासाहेबांचे प्रामाणिक राजकारण शिवसेना विसरली आहे. स्वार्थासाठी शिवसेनेने युती तोडली. युतीत असताना शिवसेनेने भाजपवर टीका केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. हे योग्य नव्हते.

केंद्राचा महाराष्ट्रावर 'फर्जिकल स्ट्राईक', उद्धव ठाकरेंचा भाजपवर आरोप