पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपची खेळी विराट कोहली सारखी : रामदास आठवले

रामदास आठवले

मी पुन्हा येईन, असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी अनअपेक्षितपणे शनिवारी मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्या साथीने भाजपने सत्ता स्थापनेचा नवा डाव मांडला आहे. फडणवीसांसोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या अनाकलनिय राजकीय परिस्थितीवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नव्या सरकारचे स्वागत केले आहे. 

अजित पवारांना 'ब्लॅकमेल' केलंय, संजय राऊत यांचा आरोप

राजकीय परिस्थितीवर रामदास आठवले म्हणाले की,  भाजप विराट कोहलीप्रमाणे खेळते. भाजपने संयमी खेळी करत महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा डाव टाकला, अशा शब्दांत त्यांनी नव्या सरकारचे स्वागत केले. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे असेल. केंद्राकडूनही राज्याला पुरेशी मदत मिळेल, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. शिवसेना को लटका दिया, कांग्रेस पार्टी को झटका दिया आणि अजित पवार को अटका दिया, अशी शेरेबाजी देखील त्यांनी राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीवर केली.  

केंद्राचा महाराष्ट्रावर 'फर्जिकल स्ट्राईक', उद्धव ठाकरेंचा भाजपवर आरोप

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असताना भाजप-शिवसेना यांच्यातील वाद टोकाला गेला होता. मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरुन राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला. परिणामी राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात खेळ रंगला. अनेक बैठकीनंतर हे तिन्ही पक्ष एकत्रित सत्ता स्थापन करणार, असे वाटत असताना शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर  अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Union Minister Ramdas Athawale said about BJP led government in Maharashtra BJP plays like Virat Kohli