पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शरद पवार म्हणाले, आज बाळासाहेब हवे होते

शरद पवार

बाहेरुन मार्गदर्शन करणारे उद्धव ठाकरे आता आखाड्यात उतरुन आपले नेतृत्व करतील, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आगामी मुख्यमंत्र्यांना आशिर्वाद दिले. महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करायचे आहे, असेही शरद पवार यावेळी म्हणाले. 

अजित पवार साहेबांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर

शिवतिर्थावर पुरेल ना? असा प्रश्न उपस्थित करत पवारांनी उद्धव ठाकरे शिवतिर्थावर शपथ घेतील, असे सांगितले. आज बाळासाहेब असायला हवे होते असे म्हणत त्यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार म्हणाले की, अनेक वर्ष बाळासाहेब आणि जॉर्ज फर्नांडीस या सारख्यांचा सहवास लाभला. आम्ही एकमेकांविरोधात मुक्त भाषेत संवाद चालायचा. शब्दांमध्ये आम्ही कमतरता केली नाही. पण वैयक्तिक सलोखा त्यांनी उभ्या आयुष्यात सोडला नाही. आमच्यातील वैयक्तिक संबंध सलोख्याचे होते. उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या भाषणामध्ये काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना धन्यवाद! म्हटल्याचेही पाहायला मिळाले.  

दीड दिवसांचा गणपती ऐकून होतो, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोमणा

देशाची सत्ता एका वेगळ्या विचाराच्या हातात आहे. देशाचे पंतप्रधानांना राज्याकडे देशातील एक घटक म्हणून पाहिलं पाहिजे. आणि ते तसेच पाहतील, त्यामुळे केंद्रात आणि राज्यातील सरकार वेगवेगळे आहे याबाबत शंका बाळगण्याच काम नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Uddhav Thanks Sonia after Being Formally Picked as Maharashtra CM Sharad Pawar Remembers Sena Founder Bal Thackeray