पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाराष्ट्रात ठाकरे सरकार, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Photo by Anshuman Poyrekar / Hindustan Times)

महाआघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतिर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीसाठी शिवतिर्थावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि कुटुंबियांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी 'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतो की...'  अशा शब्दांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

PHOTOS: शपथविधी सोहळ्यासाठी शिवतीर्थावर गर्दी  

हिंदू ह्रद्यसम्राट आणि दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अंतिम निरोप देण्यात आला त्याच शिवतिर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. हजारो लोकांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.

शपथविधीसाठी शिवतिर्थावर दिग्गजांची उपस्थिती

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे, अभिषेक मनु सिंघवी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, द्रमुक नेते एम. स्टॅलिन, टी. आर. बालू, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी आदी मान्यवर उपस्थित होते.