पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शहा राहिले दूर, उद्धव ठाकरेंची शरद पवारांशी फोनवर चर्चा

उद्धव ठाकरे (PTI file photo)

महाराष्ट्रातील महायुतीमध्ये सत्ता वाटपासाठी एकमेकांत संघर्ष सुरु असल्याचे दिसत आहे. भाजप-शिवसेनेच्या नेत्यांमध्ये यावरुन सध्या क्षणाक्षणाला शाब्दिक युद्ध सुरु आहे. याच दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी गुरुवारी रात्री फोनवरुन संवाद साधला. दोन्ही पक्षातील सुत्रांनी याला दुजोरा दिला आहे. या दोन्ही नेत्यांच्या संवादामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

...तरीही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही

खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या फोनवरुन पवार यांच्याशी संवाद साधला. शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या असतानाच ठाकरे आणि पवार यांचे फोनवर संभाषण झाले.

भाजप आणि शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत युती केली होती. यात भाजपला १०५ जागा आणि सेनेला ५६ जागा मिळाल्या. पण सध्या सत्ता स्थापण्यात ५०-५० फॉर्म्युलावरुन दोन्ही पक्षांत टोकाचे मतभेद दिसून येत आहेत. 

ठाकरे आणि पवार यांच्यात संभाव्य पाठिंब्याविषयी बोलणे झाले असल्याचे सांगण्यात येते. गरज भासल्यास राष्ट्रवादीचे ५४ आणि काँग्रेसच्या ४४ आमदारांच्या पाठिंब्याबाबत चर्चा झाली. या चर्चोत संभाव्य आघाडीबाबत चर्चा झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी बाहेरुन पाठिंबा देण्यावरुनही चर्चा झाली.

'भाजप-शिवसेनेच्या सत्तानाट्यामध्ये काँग्रेसने पडू नये'

विशेष म्हणजे, या बैठकीनंतरच राऊत यांनी भाजपला इशारा देताना शिवसेना सत्ता स्थापण्यासाठीचे अपेक्षित संख्याबळ जमवू शकते, असे सूचक वक्तव्य केले होते. 

शरद पवार हे ५ नोव्हेंबरला दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ गोटातील नेत्यांनी संभाव्य सरकारला पसंती दर्शवल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी 'हिंदुस्थान टाइम्स'ला सांगितले. भाजपला सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी आहे, असे एका नेत्याने सांगितले. 

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही नेते याबाबत सावध भूमिका घेत आहेत. शिवसेना आपला वापर करत भाजपकडून त्यांना हवे ते आपल्या पदरात पाडून घेईल, असे काहींना वाटते. 

शिवसेनेने ठरवले तर बहुमत जमवू शकते, संजय राऊतांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

शिवसेनेने प्रथम भाजपशी आपले संबंध तोडावेत असे मत एका काँग्रेस नेत्याने व्यक्त केले आहे. त्यांना जर गृहमंत्रालय आणि अर्थ मंत्रालय मिळाले तर भाजपबरोबर सरकार स्थापन करतील, अशी शक्यताही त्यांना वाटते. 

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि संजय निरुपम यांनी मात्र शिवसेनेला सहकार्य करु नये अशी भूमिका घेतली आहे. 

सेनेचं दबावतंत्र, संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट