पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार'

उद्धव ठाकरे

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून तिसरा आठवडा उलटल्यानंतरही सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. शिवसेनेने शुक्रवारी आपल्या आमदारांना ओळखपत्रासह मुंबईला येण्यास सांगितले आहे. ५ दिवस मुंबईत रहावे लागू शकते त्यामुळे कपडे सोबत घेऊन यावेत, असेही सांगण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

राज्यसभेत शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, संजय राऊत भडकले

राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन होईल. आणि महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेजीचं असतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री पदावरुन भाजप-शिवसेना यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर महायुतीला स्पष्ट बहुमत असताना राज्यातील राजकीय घडामोडींनी वेगळेच वळण घेतले आहे. भाजपला शह देण्यासाठी  शिवेसनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याची तयारी दर्शवली. 

PM मोदींसोबतच्या चर्चेत शरद पवारांनी या मुद्द्यांवर दिला भर

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये खलबतं सुरु असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या. हे तिन्ही पक्ष एकसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्याच्या दिशेने हालचाली करत आहेत. शिवसेना सत्तास्थापनेसाठी सकारात्मक असताना आघाडीच्या गोटातून संभ्रमित करुन टाकणारी विधानामुळे सत्तास्थापनेतील तिढा आणखी गुंतागुतीचा होणार का? असा प्रश्न निर्माण होत असताना शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईत बोलवून सत्तास्थापनेच्या दिशेने आगेकूच करत असल्याचे संकेत दिले आहेत.