पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव ठाकरेंनी PM मोदींना फोनवरुन दिले शपथविधीचे निमंत्रण

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे

महाष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी होणाऱ्या शपथविधीसाठी निंमत्रण दिले आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार फोनच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी हे निमंत्रण दिल्याचे समजते. या दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर काही मिनिटे चर्चा झाली. भाजप-सेना युती तुटल्यानंतर मोदी शिवतिर्थावर येणार का? याबाबत सध्या कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.   

अजित पवारांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत राष्ट्रवादीचे मौन

महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्बत झाल्यानंतर केलेल्या आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मोठ्या भावाला शपथविधीसाठी बोलवायला दिल्लीला जाईन असे म्हटले होते. पंतप्रधान मला छोटे भाऊ मानतात हे त्यांनीच आपल्या सर्वांना सांगितले असल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला होता.

आदित्य ठाकरेंनी दिल्ली दरबारी जाऊन सोनिया गांधींना दिले निमंत्रण

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजप-शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन खटकले. आमच्याकडे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री हा शिवसैनिकच असणार ही ठाम भूमिका घेतली. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीशी मोट बांधत त्यांनी शब्द खरे करुन दाखवण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली. शिवतिर्थावर उद्धव ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत काही मोजके नेतेही शपथ घेतील.     

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Uddhav Thackeray has talked to PM Narendra Modi over phone and invited him to tomorrows oath taking ceremony