पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव स्वीकारला'

उद्धव ठाकरे (PTI file photo)

ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान उद्धव ठाकरे यांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शुक्रवारी तिनही पक्षांच्या झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर सहमती मिळाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांना दिल्यानंतर शिवसेना नेते आणि गेल्या एक महिन्यांपासून भाजपवर शरसंधान साधणाऱ्या संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव स्वीकारल्याचे सांगितले. 'एएनआय'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव स्वीकारतील का याबाबत साशंकता होती. उद्धव ठाकरे यांनी नकार दिल्यास एकनाथ शिंदे, संजय राऊत, सुभाष देसाई आणि अरविंद सावंत यांच्या नावाचीही चर्चा होती. परंतु, ठाकरे यांच्याव्यतिरिक्त दुसऱ्या नेत्याच्या नावाचा विचार केल्यास त्याचा पक्षाला फटका बसेल अशी चर्चाही झाल्याचे समजते.

गुलाबी चेंडूवर अर्धा संघ तंबूत धाडणारा इशांत पहिला..

दरम्यान नेहरु सेंटर येथील बैठकीनंतर उद्धव ठाकरे हे महापौर बंगल्यात गेले होते. तिथेच उद्धव यांनी होकार दिल्याचे सांगण्यात येते.