पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभा निवडणूक : राज्यात सोमवारी १०१ उमेदवारी अर्ज दाखल

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ (प्रातिनिधिक फोटो)

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी राज्यात ६३ मतदारसंघात १०१ उमेदवारांनी १२६ नामनिर्देशनपत्रे दाखल केली, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

नवी मुंबईत शिवसेनेला धक्का; 200 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

यामध्ये जळगाव जिल्ह्यात दोन मतदारसंघात २ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तर बुलढाणा- एका मतदारसंघात २ उमेदवार, वाशिम- एका मतदारसंघात १ उमेदवार, अमरावती- चार मतदारसंघात ५ उमेदवार, वर्धा- एका मतदारसंघात एक उमेदवार, भंडारा- एका मतदारसंघात एक उमेदवार, गोंदिया- एका मतदारसंघात एक उमेदवार, चंद्रपूर- एका मतदारसंघात एक उमेदवार, यवतमाळ- २ मतदारसंघात ३ उमेदवार, नांदेड- ५ मतदारसंघात १५ उमेदवार, हिंगोली- एका मतदारसंघात एक उमेदवार, परभणी- २ मतदारसंघात ६ उमेदवार, जालना- एका मतदारसंघात २ उमेदवार, औरंगाबाद- ४ मतदारसंघात ८ उमेदवार, नाशिक- ३ मतदारसंघात ३ उमेदवार, पालघर- एका मतदारसंघात एक उमेदवार, ठाणे- एका मतदारसंघात एक उमेदवार, रायगड- एका मतदारसंघात ५ उमेदवार, पुणे- ७ मतदारसंघात ८ उमेदवार, अहमदनगर- ५ मतदारसंघात ९ उमेदवार, बीड- ४ मतदारसंघात ९ उमेदवार, लातूर- ३ मतदारसंघात ३ उमेदवार, उस्मानाबाद- एका मतदारसंघात एक उमेदवार, सोलापूर- २ मतदारसंघात २ उमेदवार, सातारा- एका मतदारसंघात एक उमेदवार, कोल्हापूर- ३ मतदारसंघात ३ उमेदवार आणि सांगली जिल्ह्यात ४ मतदारसंघात ६ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, असे त्यांनी सांगितले.