पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आमच्या रोहितला साथ द्या, शरद पवारांचे कर्जत-जामखेडकरांना आवाहन

शरद पवार

खूप वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू कर्जत-जामखेड या भागातील दुष्काळ बघण्यासाठी आले होते. पण आता या भागातील तरुणांनी परिस्थिती कशी बदलली आहे हे बघण्यासाठी देशाचे पंतप्रधान इथे येतील. येत्या पाच ते सात वर्षांत हा बदल घडविण्यासाठी रोहित पवार यांना साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी कर्जतमधील जाहीर सभेत केली.

नातू रोहित पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी या ठिकाणी सभा घेतली. या ठिकाणी सकाळपासून पाऊस पडत असल्यामुळे सभा उशिराने सुरू झाली. सभेमध्ये शरद पवार यांनी राज्यातील सरकारच्या अपयशांवर बोट ठेवले.  

भाजपच्या मंत्र्यानेच 'चंपा' शब्द तयार केला, अजित पवारांचा गौप्यस्फोट

शरद पवार म्हणाले, आज रोहित ज्या वयाचा आहे. त्या वयाचा मी असताना ५२ वर्षांपूर्वी बारामतीमधून मी निवडणूक लढण्यासाठी उभा राहिलो होतो. त्यावेळी तेथील परिस्थिती वेगळी होती. बारामतीमध्ये कारखानदारी नव्हती. शाळा-महाविद्यालये नव्हती. बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी इतकी वर्षे लागली. पण कर्जत-जामखेडचा चेहरा येत्या पाच ते सात वर्षांत बदलेल, याची मी ग्वाही देतो.

येत्या २४ तारखेनंतर या मतदारसंघात राम शिल्लक राहणार नाही, असा टोला भाजपचे उमेदवार राम शिंदे यांना लगावल्यानंतर ते म्हणाले, मुख्यमंत्रीसाहेब कुस्ती खेळायची असेल तर पैलवान लागतो. नाही त्या गोष्टी कशाला करता. राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही असला, तरी कुस्ती संघटनेचा अध्यक्ष मी आहे. तुम्ही मत नक्की मागा. त्याला माझा विरोध नाही. पण मत मागायला आल्यावर लोक प्रश्न विचारतील. पाच वर्षांत काय केलंय ते सांगायला लागेल. यासाठी ते विषय दुसरीकडे नेत आहेत. 

कमलेश तिवारी हत्याःमिठाईच्या डब्यावरुन गूढ उलगडलं, तिघे अटकेत

गेल्या पाच वर्षांत १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करायला कोणाला वेड लागलेले नाही. आज अनेक तरूण बेरोजगार आहेत. कष्ट करणाऱ्याच्या हाताला काम नाही. काम द्यायचे असेल तर कारखानदारी हवी. पण आज कारखाने बंद पडताहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.