पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करा, दखल न घेतल्यास आंदोलन करू'

मला मुख्यमंत्री करा, किसानपुत्राचं राज्यपालांना पत्र

राज्यात मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत मलाच मुख्यमंत्री करा अशा आशयाचं पत्र बीडमधले किसानपुत्र श्रीकांत गदळे यांनी राज्यपालांना लिहिलं आहे. या निवेदनाची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गानं लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल असा इशाराही गदळे यांनी दिला आहे. 

गेल्या महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. निवडणुकांचे निकालही लागले. या निकालात महायुतीला यशही मिळाले. मात्र मुख्यमंत्री पदावरून शिवसेना- भाजपात वाद सुरू आहे. त्यामुळे सत्तेसाठीचा तिढा सुटत नाही तोपर्यंत मला मुख्यमंत्री करा अशी मागणी करणारं पत्र गदळे यांनी लिहिलं आहे. 

सेनेचं दबावतंत्र, संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट

राजकारण आणि समाजकारणात गेली १० ते १२ वर्षे मी  काम करत आहे. शेतकरी आणि गोरगरिबांच्या प्रश्नावरही मी सातत्यानं लक्ष घालत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा तिढा निर्माण झाल्यानं महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग व सर्वसमान्य वर्ग अडचणीत सापडला आहे, त्यामुळे जनहितासाठी हा निर्णय घेण्यात यावा असं गदळे यांनी पत्रात लिहिलं आहे. 

बगदादीच्या मृत्यूनंतर आयसिसच्या नव्या म्होरक्याचं नाव जाहीर

सत्ता स्थापनेतील शिवसेनेच्या भुमिकेबद्दल आदित्य ठाकरेंचे मौन

मुख्यमंत्री पदाचा पदभार मला देण्यात यावा, ज्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ सोडवता येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र या निवदेनाची दखल न घेतल्यास लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:till the time matter of CM post is sorted out I should be made CM farmer Letter to governer