पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वसई- विरारमधली ठाकूर कुटुंबीयांची 'दादागिरी' संपणार- प्रदीप शर्मा

प्रदीप शर्मा

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी गेल्या महिन्यात शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेनं नुकतीच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली यात अपेक्षेप्रमाणे  प्रदीप शर्मा यांना नालासोपारा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. प्रदीप शर्मा हे बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात उभे ठाकले आहेत. हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या पक्षाची दहशत मिटवण्यासाठी मला उद्धव ठाकरे यांनी पाठवले असल्याचं ते म्हणाले. 

लोकांच्या इच्छेचा मान ठेवला - संदीप नाईक

 'वसई- विरार पट्ट्यात ठाकूर कुटुंबाची दहशत आहे. लोक ठाकूर कुटुंबीयांच्या दहशतीला कंटाळले आहेत. नालासोपाऱ्यात लोकांच्या अनेक समस्या आहेत मात्र ठाकूर कुटुंबानं कधीही त्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांच्या दहशतीपासून लोकांना स्वत:ची  सुटका करून घ्यायची आहे. इथली परिस्थिती बिहार- उत्तरप्रदेशपेक्षाही वाईट आहे. इतके वर्षे लोकांसमोर कोणताही पर्याय नव्हता आता लोकांसमोर नवा मार्ग आहे. नालासोपारा, वसई मधली ठाकूरांची दादागिरी आता कायमची संपणार' अशी जळजळीत टीका प्रदीप शर्मा यांनी केली. 

अलिबागमध्ये एकाच नावाच्या ५ जणांनी भरला उमेदवारी अर्ज

प्रदीप शर्मा ३ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज  भरणार आहे.  हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव आणि दोन वेळा आमदार राहिलेले क्षितिज ठाकूर यांनी प्रदीप शर्मा हे सुपारी घेऊन एन्काऊंटर करतात असा आरोप केला होता. 'इथली दहशत संपवायची आहे असं म्हणणं हा निवडणुकीच्या काळात घडणाऱ्या स्टंटचा भाग आहे. ते दर पाच वर्षांनी पाहायला मिळतात. प्रदीप शर्मा सारख्या लोकांना महत्त्व देण्याची गरज नाही. इथे दहशत असती तर लोकांनी आम्हाला कधीच निवडून दिले नसते. इथे कोणत्याही प्रकारची दादागिरी नाही.  प्रदीप शर्मा यांना नालासोपाऱ्याचा भूगोलच ठावूक नसावा', असं प्रत्युत्तर क्षितिज ठाकूर यांनी दिलं आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:The people of Nalasopara are tired of Thakur family pradeep sharma Maharashtra election 2019