राष्ट्रवादीत काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात रविवारी होणारी भेट सोमवारपर्यंत पुढे ढकलली गेली आहे. महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार होती. राज्यातील सत्ताकोंडीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला अत्यंत महत्त्व होते.
ब्रेकअप!, संसदेत आता विरोधी बाकावर बसणार शिवसेना
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी एका बैठकीत किमान समान कार्यक्रमाचा अहवाल तयार केला आहे. त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे.
The meeting between Congress interim president Sonia Gandhi and NCP chief Sharad Pawar has been postponed for Monday. The meeting was earlier scheduled to take place tomorrow. (File pics) pic.twitter.com/gteiThcS9G
— ANI (@ANI) November 16, 2019
तत्पूर्वी, शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी शिवसेना एनडीएच्या बैठकाला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगत सर्वकाही ठीकठाक असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यपाल भेट लांबणीवर
दरम्यान, महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यावरुन भाजपशी झालेल्या वादानंतर शिवसेना आता संसदेत विरोधी बाकावर बसणार आहे. 'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत आणि अनिल देसाई विरोधकांच्या बाकावर बसतील. त्याचबरोबर शिवसेनेचे १८ लोकसभा सदस्यही विरोधी पक्षातच बसतील, असेही बोलले जात आहे. आतापर्यंत हे सर्व खासदार सत्ताधाऱ्यांबरोबर बसत होते.