पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आदित्यला आशीर्वाद देणाऱ्यांचा ऋणी, उद्धव ठाकरेंचे 'मनसे' आभार

आदित्य ठाकरे

आदित्यला आशीर्वाद आणि पाठिंबा देणाऱ्यांचा मी कायम  ऋणी राहिल अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचे आभार मानले आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी वरळी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होते. ठाकरे कुटुंबातून निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे हे पहिलेच सदस्य आहेत. 

पंढरपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने, दोघांनीही जाहीर केले उमेदवार

दरम्यान, वरळीमधून मनसेने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. मनसेने आपली उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यातून वरळी मतदारसंघातून मनसेनं आपला उमेदवार दिला नाही. आदित्य ठाकरे यांना पक्षाने उघडपणे पाठिंबा दिलेला नसला, तरी विरोधात उमेदवार न देता आदित्य ठाकरे यांना मनसेने एकप्रकारे पाठिंबाच दिला असल्याची चर्चा आहे. यावर उद्धव ठाकरेंना विचारलं असता त्यांनी नाव न घेता मनसेचे आभार मानले आहेत. 

मनसेला धक्का, नितीन नांदगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश

 'आदित्यवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्यांचा आणि त्याला आशीर्वाद देणाऱ्यांचा मी कायम ऋणी असेन. राजकारणात सक्रीय असलेली ही ठाकरे कुटुंबीयांची तिसरी पीढी आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेसाठी काम करण्याचा मला अभिमान आहे', असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही मी महाराष्ट्रच्या जनतेसाठी काम करत राहिन, अशी प्रतिक्रिया उमेदवारी अर्ज  दाखल केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आदित्य ठाकरे यांचं नाव चर्चेत आहे. 

मनसेची ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, ग्रामीण भागावर भर

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:thank all those who have shown love and given their blessing to Aaditya Uddhav Thackeray on Raj Thackeray cooperation