पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ठाण्यात प्रचार सोडून मनसे उमेदवार घालतोय पोलिस ठाण्याचे खेटे

मनसे

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या प्रचाराचा नारळ गुरुवारी रात्री मुंबईत फुटला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईत सभा झाल्या. आता खऱ्या अर्थाने मनसेच्या प्रचाराला सुरुवात झाली. मात्र ठाण्यातील उमेदवारांना प्रचार करण्याऐवजी पोलिस स्टेशनला ये-जा करावी लागत आहे. 

कलम ३७० हटवले त्याबद्दल अभिनंदन! पण...

ठाण्यातील ओवळा माजीवडा मतदार संघातील मनसेचे उमेदवार संदीप पाचंगे यांनी दोन महिन्यापूर्वी ठाण्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविरोधात आंदोलन केले होते. त्यांनी या खड्ड्यांमध्ये शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे व्यंगचित्र काढले होते. 

आदित्य ठाकरे यांच्या विरोधातील बिचुकलेंना EC ने धाडली नोटीस

ठाणे पोलिसांनी या आंदोलनाप्रकरणी मनसेचे उमेदवार संदीप पाचंगे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याविरोधात निवडणुकीनंतर अटकेची कारवाई केली जाईल असे सांगून त्यांना सोडण्यात आले होते. मात्र आता निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली असताना उमेदवार संदीप पाचंगे यांना याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये ये-जा करावी लागत आहे.

'ब्लू फिल्म काढली असती तर बरं झालं असतं'    

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:thane mns candidate does not organise election rally beacuse of previous criminal records