पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोल्हापूरमध्ये निवडणूक कामादरम्यान शिक्षकाचा हार्ट अटॅकने मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सोमवारी मतदान पार पडले. २८८ जागांसाठी झालेल्या या मतदानाला पावसाचा फटका बसला. राज्यात ६०.४३ टक्के मतदान झाले. या मतदान प्रक्रियेवेळी अनेक निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या. अशातच गडचिरोली येथे निवडणूक कर्तव्यावर अलेल्या शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना कोल्हापूरमध्ये देखील एका कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. याबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी माहिती दिली. 

 

मुलुंडमध्ये नाराज पीएमसी बँक खातेधारांनी निवडला 'नोटा' पर्याय

कोल्हापूरातील करवीर येथे निवडणूक कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सर्जेराव भुसे असं या शिक्षकाचे नाव आहे. तर ठाण्यामध्ये निवडणूक बंदोबस्ताला असलेल्या पोलिसाला हृदयविकाराचा झटका आला. रामबाग येथील नूतनशाळेवर ते बंदोबस्तासाठी उभे होते. ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

Maharashtra Exit Polls: पुन्हा महायुतीकडेच सत्तेचा अंदाज

दरम्यान, गडचिरोलीमध्ये निवडणूक कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाचा भोवळ येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. बापू पांडू गावडे (४५ वर्ष) असे या शिक्षकाचे नाव आहे. ते एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कार्यरत होते. बापू गावडे निवडणूक कर्तव्यावर पायी चालत जात असताना भोवळ येऊन पडले. त्यांचा चंद्रपुर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

भोसरीः मतदानासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू