पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गडचिरोलीत निवडणूक कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाचा मृत्यू

नाल्यात पडून मुलाचा मृत्यू

गडचिरोलीमध्ये निवडणूक कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाचा भोवळ येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बापू पांडू गावडे (४५ वर्ष) असे या शिक्षकाचे नाव आहे. ते एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कार्यरत होते. बापू गावडे निवडणूक कर्तव्यावर पायी चालत जात असताना भोवळ येऊन पडले. त्यांचा चंद्रपुर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

बोगस मतदारांवरुन बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यात जुंपली

बापू गावडे यांची विधानसभा निवडणूकीसाठी एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथील मतदान केंद्रावर ड्यूटी लागली होती. मतदान केंद्र पथक हेडरी बेस कॅम्पवरून पुरसलगोंदी केंद्राकडे पायी जात असताना गावडे हे भोवळ येऊन पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. 

अमरावतीत स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारावर हल्ला; गाडी पेटवली

जखमी अवस्थेत त्यांना ताबडतोब एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र बापू गावडे प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना उचारासाठी अहेरी येथे हलवण्यात आले. त्यानंतर तिथून चंद्रपूर येथील रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

करमाळा मतदारसंघातील मतदान केंद्रावर दोन गटांत हाणामारी