पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आजचा सूर्योदय एक नवा इतिहास रचतोय'

खासदार सुप्रिया सुळे

आजचा सूर्योदय एक नवा इतिहास रचतोय, देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करु, असं म्हणत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला नव्या वाटचालीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

शपथविधीसाठी मुंबईतले हे रस्ते बंद, या पर्यायी मार्गाचा करा वापर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी सांयकाळी पार पडत आहे. उद्धव ठाकरे हे संध्याकाळी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी देशातील अनेक राजकीय मंडळी उपस्थित राहणार आहेत. नव्या सरकारसाठी सुप्रिया सुळेंनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

... म्हणून मोदी परदेश दौऱ्यांवेळी हॉटेलमध्ये उतरणे टाळतात

'आजचा सूर्योदय एक नवा इतिहास रचतोय. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करु.' असं सुप्रिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. 

संजय राऊत यांचे पुन्हा एक नवे ट्विट, शिवसैनिकांचा उत्साह शिगेला