राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी साताऱ्यातील सभेत तुफान पाऊस पडत असताना जनतेला संबोधित केले. पावसालाही न जुमानता प्रचाराच्या रिंगणात उतरलेल्या पवारांचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. अशातच पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही वडिलांच्या जिद्दीचं कौतुक केलं आहे.
काँग्रेसच्या प्रचारातून आक्रमकपणा 'गायब', नेत्यांची पाठ
साताऱ्याच्या मातीनं आज पुन्हा इतिहास घडविला. तुफान पावसातही माणसांनी तुडूंब भरलेलं मैदान आदरणीय पवार साहेबांना ऐकत होतं. 'वारं फिरलंय, इतिहास घडणार', हा संदेश देणाऱ्या या राष्ट्रवादीच्या सर्वांनाच उर्जा दिलीये असे कौतुकोद्गार सुप्रिया सुळेंनी काढले आहे.
साताऱ्याच्या मातीनं आज पुन्हा इतिहास घडविला. तुफान पावसातही माणसांनी तुडूंब भरलेलं मैदान आदरणीय @PawarSpeaks साहेबांना ऐकत होतं. 'वारं फिरलंय,इतिहास घडणार', हा संदेश देणाऱ्या या सभेनं @NCPspeaks च्या सर्वांनाच नवी उर्जा मिळाली. pic.twitter.com/yMF7kPd5qK
— Supriya Sule (@supriya_sule) October 18, 2019
शरद पवार यांनी गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात झंझावाती प्रचार दौरा केला राज्याच्या वेगवेगळ्या भागात जाऊन प्रचारसभा घेत भाजप-शिवसेनेच्या कारभाराचे वाभाडे काढले. शुक्रवारी साताऱ्यातील त्यांच्या भाषणापेक्षा भरपावसात उभे राहून त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेले बळ, सत्ताधारी युतीविरोधात लढण्यासाठी दाखवलेला खंबीरपणा याचीच चर्चा सोशल मीडियाच्या वर्तुळात सुरू झाली.
...तर नेहरुंनाही वीर जवाहरलाल नेहरु म्हणेन : उद्धव ठाकरे
शरद पवार यांची साताऱ्यातील सभा झाल्यापासून अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्याचे फोटो आपापल्या हँडल्सवर शेअर केले आहेत. अनेकांनी आपल्या व्हॉट्स अॅप स्टेटसमध्ये पवारांचे फोटो देखील ठेवले होते.