पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धनंजय मुंडेंना राज्य महिला आयोग नोटीस बजावणार

धनंजय मुंडे

भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान मंत्री पंकजा मुंडे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंना राज्य महिला आयोगाकडून नोटीस बजावण्यात येणार आहे. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यासंदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंविरोधात वाद पेटला आहे. 

'कालच्या घटनेनंतर जग सोडून जावं असं वाटतंय'

आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडेविरोधात जुगल किशोर लोहियांच्या तक्रारीनंतर परळी शहर पोलिसांनी कलम ५०९ आणि कलम ५९४ गुन्हा दाखल केला. त्यानंतर यासंदर्भात राज्य महिला आयोगाकडे धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. याची दखल घेत राज्य महिला आयोग धनंजय मुंडेंना नोटीस बजावणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

रमेश कदम प्रकरण: पीएसआय बडतर्फ तर ४ कॉन्स्टेबल निलंबित

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. जे वक्तव्य मी केले नाही त्यावरुन मला बदनाम केले जातेय. मी नातं जपणारा माणूस आहे. बहिण भावाचे नाते रक्ताचे असते. माझ्या भाषणाचा आशय वेगळा होता. माझ्या शब्दाचा अनर्थ कोणी काढला याचा मी शोध घेणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले. 

भारताची POKमध्ये कारवाई; दहशतवादी तळ उद्ध्वस्त, पाकचे ५ सैनिक ठार