पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'एकच वादा..अजितदादा', मंत्रिमंडळ स्थापण्याआधी समर्थकांची घोषणाबाजी

अजित पवार

देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुंबईतील वायबी सेंटरमध्ये अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली होती. अजित पवार यांनी चार दिवसांनंतर उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि स्वगृही ते परतले. आता त्याच वायबी सेंटरमध्ये अजित पवार यांच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठीच्या महाविकास आघाडीच्या हालचाली तीव्र झाल्यानंतर या घोषणा देण्यात आला. अजित पवार यांच्या कारसमोर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करुन 'एकच वादा अजितदादा..' अशा घोषणा दिल्या. 

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे शिवसेनेला मुंबईत पहिला धक्का

तत्पूर्वी, चार दिवसांनंतर प्रथमच माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी मंत्रिमंडळात आपल्याला स्थान द्यायचे की नाही हे उद्धव ठाकरे आणि पक्षाचे श्रेष्ठी ठरवतील, असे म्हटले होते. त्यातच अजित पवार हे सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार असल्याच्या वावड्या ही उठल्या होत्या. त्यामुळे अजित पवार हे पुन्हा मंत्रिपद स्वीकारतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपण आधीही राष्ट्रवादीमध्ये होतो, आताही आहे आणि यापुढेही राष्ट्रवादीतच असू. आपल्याला पक्षाने काढलेले नाही, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते.

सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकले: खडसे

आमदारकीच्या शपथविधीनंतर वायबी सेंटरमधील पक्षाच्या बैठकीनंतर बाहेर जाताना त्यांच्या समर्थकांनी त्यांना घेरले आणि त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. एकच वादा, अजितदादा, अशा घोषणा देत समर्थक त्यांच्या कारसमोर आले. त्यातूनच अजित पवार यांनी मार्ग काढला.

योग्यवेळी योग्य गोष्टी सांगेन, काळजी करु नकाः देवेंद्र फडणवीस