पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चोवीस तासांत संजय राऊतांनी दुसऱ्यांदा घेतली शरद पवारांची भेट

संजय राऊत (फोटो सौजन्य: प्रतिक चोरगे/ हिंदुस्थान टाइम्स)

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबतच्या चर्चेनंतर शिवसेनेसोबत सरकार स्थापनेसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी गुगली टाकली. त्यांच्या या विधानानंतर शिवसेना बळीचा बकरा ठरतेय का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगण्यास सुरुवात झाली. मात्र त्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची दिल्लीतील  त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ही भेट राज्यातील ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मात्र शिवसेनेच्या नेतृत्वाखाली लवकरच राज्यातील तिढा सुटेल, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

 शरद पवारांच्या दिल्लीतील 'त्या' वक्तव्यामागे दडलेल्या ५

शरद पवार यांच्या पहिल्या भेटीचे चोवीस तास उलटण्यापूर्वीच पुन्हा एकदा संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. दहा मिनिटांच्या या भेटीमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याबाबतची माहिती गुलदस्त्यातच आहे. मात्र बुधवारी  दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांमध्ये होणाऱ्या बैठकीपूर्वी झालेली ही भेट राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालीचा एक भागच असल्याचे मानले जात आहे. 

सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात केंद्राचा मोठा खुलासा

दिल्लीतील सोनिया गांधीसोबतच्या बैठकीनंतर शरद पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कुणासोबतही सरकार स्थापन करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे वक्तव्य केले होते. याशिवाय सरकार स्थापनेसाठी समन्वय समितीच्या माध्यमातून एकसूत्री कार्यक्रमाचाही विचार सुरु नाही असे त्यांनी म्हटले होते. मात्र राज्यातील शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटातील हालचाली थांबलेल्या दिसल्या नाहीत. एका बाजूला बुधवारी दिल्लीत आघाडीच्या नेत्यांमध्ये खलबतं होणार आहेत.

आपापसातील भांडणात दोघांचेही नुकसान, भागवतांचे सूचक वक्तव्य

दुसरीकडे शिवसेनेने आपल्या आमदारांना शुक्रवारी मुंबईत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेच्या आमदारांना पाच दिवसांच्या तयारीनं मुंबईला येण्याचे आदेश मातोश्रीवरुन काढण्यात आले आहेत. शिवसेनेच्या आमदारांना ओळखपत्रासह बोलवणं आल्यामुळे सत्तास्थापनेचा पेच सुटणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. राज्यपालांनी ओळख परेड घेतली तर ओळखपत्र गरजेचे असते. त्यामुळे सत्तास्थापनेचा दावा लवकरच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.