पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बंडखोर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी

तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी

बंडखोर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाईमुळे तृप्ती सावंत यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानंतर तृप्ती सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना कार्यालयातून प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. तृप्ती सावंत या वांद्रे पूर्व मतदार संघाच्या शिवसेनेच्या माजी आमदार आहेत. 

आदित्य ठाकरेंचा वरळीत मॉर्निंग वॉकद्वारे प्रचार

शिवसेनेने वांद्रे पूर्व मतदार संघातून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे वांद्रे पूर्व मतदार संघामध्ये शिवसेना विरुध्द शिवसेना असा संघर्ष पहायला मिळणार होता. मात्र त्यापूर्वीच शिवसेनेने तृप्ती सावंत यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

विलेपार्लेजवळ भरधाव ट्रकची रिक्षा-टॅक्सीला धडक; चौघे गंभीर जखमी 

तृप्ती सावंत या दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत. बाळा सावंत यांच्या निधनानंतर २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत त्यांनी ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता. दरम्यान तृप्ती सावंत यांनी आमदार असताना जनतेची जी कामं केली पाहिजेत ती केली नाहीत, असा आरोप विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. 

आम्ही ज्यांना नाकारले तेवढेच पवारांसोबत : CM फडणवीस