पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सेनेच्या खासदारांनी घेतली सोनिया गांधींची भेट

शिवसेनेच्या खासदारांनी घेतली सोनिया गांधींची भेट

राज्यातील सत्तासंघर्षामध्ये टोकाचे मतभेद बाजूला सारुन काँग्रेस-शिवसेना एकत्रित आले आहेत. राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना नेते एका छताखाली आले असताना दिल्लीत शिवसेनेच्या खासदरांनी चक्क काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. 

धनंजय मुंडे म्हणाले की, अजित दादांवरील प्रेम हा वेगळा विषय!

खासदार अरविंद सावंत, गजानन कीर्तीकर, अनिल देसाई आणि राहुल शेवाळे यांनी सोमवारी सोनिया गांधींची भेट घेतली. राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना शिवसेना नेत्यांनी थेट सोनिया गांधींची भेट घेण्याची ही पहिली वेळ आहे. भेटीमध्ये या नेत्यांमध्ये काही चर्चा झाली का? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण ही भेट सर्वांच्या भुवय्या उंचावणारी अशीच आहे.  

आदित्य ठाकरेंच्या या कृतीकडे लक्ष वेधत शेलारांचा सेनेला टोला

महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री पदाच्या मुद्यावरुन भाजप-शिवसेना यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या साथीने सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरु केले. या पक्षांचे प्रयत्न अखेरच्या टप्प्यात असताना अचानकपणे भाजपने अजित पवारांच्या साथीने रात्रीत वारे फिरवले. त्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये एकीचे बळ दिसत आहे.