पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेना खासदार धैर्यशील मानेंचे भर पावसात भाषण

शिवसेना खासदार धैर्यशील माने

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. दसऱ्याचे औचित्य साधत काही पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला. दरम्यान, शिवसेना खासदार धैर्यशील माने यांची सांगलीमध्ये झालेली सभा खूप गाजली. कारण धैर्यशील माने यांनी भर पावसात भाषण केले. इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील युतीचे उमेदवार गौरव नायकवडी यांची प्रचार सभा मंगळवारी रात्री पार पडली. वाळवा चौकामध्ये या सभेचे आयोजन केले होते. धैर्यशील माने यांनी या सभेला उपस्थिती लावली होती. 

काँग्रेस पक्ष स्वतःची ओळख विसरलाय, राधाकृष्ण विखेंची टीका

शिवसेना खासदार धैर्यशील माने सभेदरम्यान भाषणासाठी उभे राहताच पावसाला सुरुवात झाली. यावेळी सभास्थळी उपस्थित असलेले नागरिक निघून जायला लागले. मात्र धैर्यशील माने यांनी सर्वांना जागेवर बसण्याचे आवाहन केले. त्यांनी पावसामुळे सभा थांबवली नाही. तर भर पावसात भाषण ठोकले. यावेळी मंच उपस्थित भाजप-सेनेच्या नेत्यांना आणि सभास्थळी उपस्थित नागरिकांना देखील पावसात भिजावे लागले. 

मंदीमुळे चित्रपटगृहांना अच्छे दिन, सिनेमे हाऊसफुल्ल

दरम्यान, 'वरुणराजा पावसाच्या रुपाने नायकवडींना आशिर्वाद देत आहे. भविष्याची धुरा तुझ्या हातात दिली आहे. वाळवा तालुक्याचे नाव महाराष्ट्रात करायचे असे आशिर्वाद वरुणराज्याने दिले असल्याचे धैर्यशील माने यांनी सांगितले. तुम्ही माझ्यासाठी चार पाऊलं चालला आहात. हा धैर्यशील तुमच्यासाठी दहा पाऊलं चालेल. जिथेजिथे पोहचता येईल तिथे मी खासदार म्हणून पोहचण्याचा प्रयत्न करेल.', असे आश्वासन धैर्यशील माने यांनी यावेळी दिले. 

एसबीआयकडून ग्राहकांना दिवाळी भेट; सहाव्यांदा व्याज दरात