पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कुठल्याही परिस्थितीत सत्ता येणार: उध्दव ठाकरे

उद्धव ठाकरे

कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी उस्मानाबाद येथे व्यक्त केला. उस्मानाबादचे युतीचे उमेदवार कैलास गाडगे-पाटील यांच्या प्रचारासासाठी उस्मानाबाद येथे उध्दव ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा झाली. यावेळी 'आम्हाला खुर्च्या पाहिजेत पण फक्त उबवण्यासाठी नकोय, तर सत्ता राबवण्यासाठी खुर्च्या पाहिजेत, असे मत उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले.

पाच वर्षांपूर्वी अमित शहा हे नाव कोणाला माहिती होते का? - शरद पवार 

'सध्या राजकारण हे विचित्र झाले आहे. नक्की टीका कोणावर करायची हेच कळत नाही. आज ज्यांच्यावर टीका करायची उद्या ते आमच्याच मित्रपक्षात बसलेले असतात', असे उध्दव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तसंच, 'भाजपने आजपर्यंत जी काही चांगली कामं केली आहेत. त्यामध्ये शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे. शिवसेनेने पाठिंबा दिला नसता तर सरकार अस्तिर राहिले असते. ते कधीही पडले असते', असे त्यांनी सांगितले.  

नियंत्रण रेषेवरील सैन्यदलांच्या संख्येत लष्कराकडून मोठी वाढ

दरम्यान, 'गेल्या ५ वर्षात शिवसेनेने अनेक प्रश्न उचलून धरले. जे काम विरोधकांनी करायला पाहिजे होते ते सत्तेत बसून सुध्दा शिवसेनेने करुन दाखवले आहे. शेतकऱ्यांना पिकविम्याच्या रक्कमा मिळवून दिल्या. शिवसैनिक शेतकऱ्याच्या मागे उभा होता. कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे', असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले आहे. 

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली यांची निवड निश्चित