पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उध्दव ठाकरेंच्या सभेसाठी उस्मानाबादमध्ये शाळेची संरक्षण भिंत तोडली

उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची उस्मानाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. युतीचे उमेदवार कैलास गाडगे पाटील यांच्या प्रचारासासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या सभेच्या ठिकाणावरुन जोरदार चर्चा सुरु झाला आहे. या सभेसाठी शाळेची संरक्षण भिंत दोन ठिकाणी तोडण्यात आली आहे तसंच विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे उस्मानाबादमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे. 

झाकीर नाईकच्या भाषणांमुळे प्रभावित होऊन १२७ तरूण आयसिसच्या संपर्कात

उध्दव ठाकरे यांची सभा उस्मानाबाद येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर होणार आहे.  सभा स्थळी शाळेची संरभक्षण भिंत दोन ठिकाणी तोडून रस्ता बनवण्यात आला आहे. या सभेसाठी घेण्यात आलेल्या परवानगीमध्ये संरक्षण भिंत तोडावी असा कुठेही उल्लेख केलेला नाही. तरी सुध्दा आयोजकाने भिंत तोडून रस्ता बनवला आहे. 

नियंत्रण रेषेवरील सैन्यदलांच्या संख्येत लष्कराकडून मोठी वाढ

दरम्यान, जिल्हा परिषद शाळेतील १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु आहे. मात्र उध्दव ठाकरेंच्या सभेमुळे १० वीच्या विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकात बदल करत त्यांचा पेपर १० ऐवजी सकाळी ७ वाजता घेण्यात आला. तर ११ वीच्या विद्यार्थ्यांचा केमिस्ट्री विषयाचा पेपर रद्द करण्यात आळा आहे. येत्या १८ ऑक्टोबरला हा पेपर होणार आहे. तसंच, दुसऱ्या सत्रातील परीक्षेची वेळ देखील बदलली आहे. सभास्थळी लावण्यात आलेल्या लाऊड स्पीकरमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आवाजाचा त्रास झाला. या प्रकारामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली यांची निवड निश्चित