पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संजय राऊतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सानपांची घेतली भेट

संजय राऊत आणि बाळासाहेब सानप भेट

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसेचे उमेदवार बाळासाहेब सानप यांची भेट घेतली. नाशिक येथील बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली. संजय राऊत आणि बाळासाहेब सानप यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

वाहन उद्योगाचे बुरे दिन अद्याप कायम, विक्रीचा आलेख खालच्या दिशेने

संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. दोघांमध्ये एका बंद खोलीमध्ये जवळपास २५ मिनिटं चर्चा झाली. विधानसभा निवडणूक काळामध्ये दोघांमध्ये भेट झाल्यामुळे नाशिकमध्ये चर्चांना उधाण आले आहे. बाळासाहेब सानप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक पूर्वचे उमेदवार आहेत. 

मला जे योग्य वाटलं तेच मी केलं: राजनाथ सिंह

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब सानप हे आदी भाजपमध्ये होते. पाच वर्षे ते भाजपचे आमदार होते . मात्र भाजपने त्यांना नाशिक पूर्वमधून उमेदवारी न दिल्यामुळे ते नाराज झाले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून त्यांना नाशिक पूर्वमधून विधानसभेचे तिकीट देण्यात आले आहे.  

'अयोध्येतील जागा मुस्लिमांनी राम मंदिरासाठी देऊन टाकावी'