पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

होय, मी निवडणूक लढवतोय - आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ज्याची चर्चा सुरू होती. ती घोषणा अखेर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केली. मी निवडणूक लढवतोय, असे त्यांनी वरळीमध्ये शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात सगळ्यांसमोर जाहीर केले. ठाकरे कुटुंबातील निवडणुकीच्या मैदानात उतरणारे आदित्य ठाकरे हे पहिलेच नेते असणार आहेत. यापूर्वी ठाकरे कुटुंबातील कोणीही निवडणूक लढविलेली नाही. मुंबईत वरळी मतदारसंघातून ते निवडणुकीला उभे राहणार आहेत. 

अजितदादांविरोधात मुख्यमंत्री ढाण्या वाघाला मैदानात उतरवणार

आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यावर मेळाव्याला उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी टाळ्या वाजवून आणि 'आदित्य ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा देऊन त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे. आतापर्यंत शिवसेना पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केलेल्या प्रत्येकाचे यावेळी आदित्य ठाकरे यांनी आभार मानले.

शिवस्मारक प्रकल्पात कोट्यवधीचा घोटाळा : काँग्रेस

ते म्हणाले, निवडणूक लढविण्याचा निर्णय स्वतःसाठी घेतलेला नाही. जनसंवाद यात्रेत मतदारांनी आदेश दिला होता की निवडणूक लढवली पाहिजे. त्यामुळेच मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री होण्यासाठी मी निवडणूक लढणार नाही तर जनतेची स्वप्ने साकार करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:shivsena leader aditya thackeray will contest maharashtra assembly election 2019 from worli