पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'सेनेकडे पर्याय आहेत मात्र ते स्वीकारण्याचे पाप माथी नको'

शिवसेनेचे खासदार संजय  राऊत

'उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलं की शिवसेनेकडे पर्याय आहेत मात्र ते स्वीकारण्याचं पाप आमच्या माथी नको. सेनेनं नेहमीच राजकारणात सत्याला महत्त्व दिलं, आम्ही सत्तेसाठी भुकेलो नाही', अशी  प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय  राऊत यांनी एएनआयला दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट

विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळाल्या नसल्या तरी युतीनं बाजी मारली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा रंग बदलला आहे. सत्ता स्थापनेवरून सेना- भाजपात सुरू असलेल्या वादाची चर्चा राजकारणात रंगली आहे. अशातच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सहकार्यानं नवीन सरकार स्थापन करणार अशी चर्चाही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहे. 

मात्र आता शिवसेनेकडे पर्याय असले तरी सत्तेच्या लालसेसाठी ते स्वीकारणार नाही असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. निवडणुकीआधी युतीची घोषणा झाली होती. मात्र सत्ता स्थापनेचं घोंगडं अजूनही भिजत  आहे या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी शरद पवारांवर टीका केली. शरद पवार हे भाजप आणि काँग्रेसविरोधी वातावरण तयार करत आहेत, असं ते म्हणाले. 

 

... अशा पद्धतीने शरद पवारांनी आपल्या पक्षाला यश मिळवून दिले

गेल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामध्ये शिवसेनेने ५६ जागांवर विजय मिळवला. तर  भाजपचे १०५ उमेदवार यशस्वी ठरले आहेत. महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्यासाठी विधानसभेत १४५ आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. शिवसेनेने गेल्याच आठवड्यात सत्तेची समसमान वाटणी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्रीपदही अडीच वर्षे शिवसेनेला आणि अडीच वर्षे भाजपला दिले गेले पाहिजे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. त्यामुळे या आठवड्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये होणारी चर्चा महत्त्वाची असणार आहे.

मुंबईकर मराठी माणसाचा विश्वास शिवसेनेवर, निवडणुकीतून स्पष्ट

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Shivsena dont want to do the sin of accepting that alternative Sanjay Raut Maharashtra Assembly Election 2019