पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव ठाकरेंची वचनपूर्ती! श्रीनिवास वनगा यांना दिले तिकीट

उद्धव ठाकरे (Photo by Satish Bate)

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोणता पक्ष कोणत्या चेहऱ्याला आपली उमेदवार देतोय, याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपने अनेक दिग्गज नेत्यांचा जीव टांगणीला लावला असताना शिवसेना वचनाला जागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेने पालघरमदील भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे. या निर्णयाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वनगा कुटुंबियांना दिलेला शब्द  पाळला आहे.  

तिसऱ्या यादीनंतरही भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या पदरी निराशाच

२०१४ मध्ये चिंतामण वनगा हे भाजपचे खासदार म्हणून निवडून आले. त्यांच्या आकस्मित निधनानंतर त्यांच्या मुलाला तिकीट मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र भाजपने त्यांना तिकीट दिले नाही. वनगा यांच्या निधनानंतर आम्हाला पक्षाने वाऱ्यावर सोडल्याची भावना व्यक्त करत वनगा कुटुंबियांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत शिवबंधन बांधले. वनगा यांच्या कुटुंबियांना कदापि वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना न्याय देणार. श्रीनिवास तू आता थांब. तुझा पुढे विचार करू असा अशा शब्द शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगा यांना दिला होता. 

काँग्रेसला माझ्या सेवेची गरज नाही, संजय निरुपम यांची जाहीर

एवढेच नाही तर पालघरच्या पोटनिवडणुकीत भाजप विरूद्ध शिवसेना असा सामना रंगला होता. उद्धव यांनी श्रीनिवास यांना मैदानात उतरविले तर भाजपने राजेंद्र गावित यांना कॉंग्रेसमधून आयात करून तिकिट दिले. यात श्रीनिवास वनगा यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आता पालघरमधून विद्यमान आमदार अमित घोडा यांना तिकिट न देता श्रीनिवास वनगा यांना तिकीट देण्याचा मोठा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.