पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मातोश्रीच्या अंगणात महापौरांचाच पराभव

महापौर विश्वनाथ महाडेश्वर

वांद्रे विधानसभा मतदार संघात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मातोश्रीच्या अंगणातच शिवसेनेचे उमेदवार आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दीकी याने महाडेश्वर यांचा दारुण पराभव करत विजय मिळवला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारल्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला पराभव आला असल्याचे म्हटले जात आहे. तृप्ती सांवत यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यामुळे वांद्रे मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. तसंच शिवसैनिका मातोश्रीसमोर रात्रभर ठिय्या देऊन बसले होते.  

जनतेला सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाहीः शरद पवार

काँग्रेसचे विजयी उमेदवार झिशान सिद्दीकी यांना ३७ हजार ६३६ मतं मिळाली आहे. तर शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांना २३ हजार ०६९ मतं मिळाली आहेत. झिशान सिद्दीकी यांनी १४ हजार ५६७ मतांनी महाडेश्वरांचा पराभव केला. तसंच शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत यांना २३ हजार ८५६ मतं मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनच्या पराभवाचे प्रमुख कारण तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारली असल्याचे बोलले जात आहे. तर, मनसेच्या अखिल चित्रे यांना १० हजार ४०३ मतं मिळाली आहेत. 

साताऱ्यात उदयनराजे भोसलेंचा पराभव, मतदारांची नाराजी