पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाशिकमध्ये शिवसेनेला झटका; ३६ नगरसेवक, ३५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

नाशिकमध्ये शिवसेना नगरसेवकांचा राजीनामा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या ३५० पदाधिकारी आणि ३६ नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून शिवसेनेची मनधरणी करण्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आले आहे. 

मुख्यमंत्री झोपेत सुद्धा माझे नाव घेत असतील : शरद पवार
 
नाशिक पश्चिमची जागा भाजपला सोडल्याने भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. या मतदार संघात भाजपने घुसखोरी केल्याचे सांगत विलास शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या ३५० पदाधिकारी आणि ३५ नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. 

मोदींच्या सभेसाठी पुण्यात झाडांची कत्तल

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे नाशिकमध्ये भाजप आमदार सीमा हिरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. 

शेंबडं पोरंही सांगेल राज्यात महायुतीचंच सरकार येणारः फडणवीस