पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपने २०१४ मध्ये राष्ट्रवादीचा घेतलेला पाठिंबा लाचारी नव्हती का?, सेनेचा सवाल

भाजप नेते

बहुमत चाचणीला सामोरे न जाताच फडणवीसांचे सरकार पळून गेले. इतकी नाचक्की महाराष्ट्रात कोणत्याच सरकारची व राजकीय पक्षाची झाली नव्हती. महाराष्ट्रातील एक मस्तवाल हैदोस थांबला, अशा शब्दांत शिवसेनेने देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर घणाघाती हल्ला केला. महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी वगैरे २०१४ साली राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपने घेतला होता. तेव्हा ती लाचारी नव्हती, मग आता लाचारी कसली?, असा सवाल करत महाराष्ट्राने दबाव झुगारला व आमदारांनी स्वाभिमान राखला असे शिवसेनेने म्हटले आहे.

शिवसेनेने आपल्या 'सामना' या मुखपत्रातून भाजपवर हल्लाबोल केला. काय म्हटलंय शिवसेनेने..

हीच ती वेळ! २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे शिवतिर्थावर घेणार शपथ

आम्ही आमदार फोडू व बहुमत दाखवू या विकृतीसही सर्वोच्च न्यायालयाने वेसण घातली. बहुमत चाचणी गुप्त मतदानाने नको, तर त्याचे लाइव्ह प्रक्षेपण करा, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे ईडी, इन्कम टॅक्स वगैरे भाजपचे कार्यकर्ते काय करणार? संविधान दिवसाच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल यावा आणि थैलीशाहीचे आणि दमनशाहीचे राजकारण करू पाहणाऱ्यांना दणका बसावा हादेखील एक चांगला योगायोगच म्हणावा लागेल. सत्ताधाऱयांनी जरी लोकशाही मूल्यांचा आणि तत्त्वांचा बाजार मांडला असला तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तो उधळला गेला. पैशांच्या बॅगा घेऊन एजंट आमदारांच्या पाठी फिरत होते. बहुमत विकत घेऊन राज्य करण्याचा हा प्रयत्न केविलवाणा ठरला. जाता जाता फडणवीसांनी शिवसेनेवर दोषारोप केले आहेत. शिवसेना सत्तेची लाचार असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. हे सांगणे म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबा म्हणाव्या लागतील. शिवसेनेस सत्तेची लाचार म्हणणाऱ्यांनी स्वतःच्या अंतरंगातील जळमटे आधी पाहावीत. 

शरद पवार म्हणाले, आज बाळासाहेब हवे होते


दिलेल्या शब्दास जागण्याची इच्छा असती तर ही वेळ भाजपवर आली नसती. तुम्ही खोटे बोललात व शिवसेनेला खोटे पाडण्याचा प्रयत्न केलात. त्यामुळे महाराष्ट्राचे स्थैर्य व स्वाभिमान यासाठी आम्ही तीन पक्षांनी एकत्र यायचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी वगैरे २०१४ साली राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपने घेतला होता तेव्हा ती लाचारी नव्हती. मग आता लाचारी कसली? भाजपचे वैफल्य असे आहे की इतर राज्यांत जे करू शकले ते त्यांना महाराष्ट्रात घडवता आले नाही. महाराष्ट्राने दबाव झुगारला व आमदारांनी स्वाभिमान राखला. महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी. येथे स्वाभिमानाचा ज्वालामुखी सदैव उसळत असतो. या स्वाभिमानाला डिवचण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा झाला तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने पाणी दाखवले. महाराष्ट्रात भाजपने सत्तेसाठी इतके अगतिक का व्हावे? इतके अनैतिक व तत्त्वशून्य वागण्याची वेळ त्यांच्यावर यावी हे दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांच्या आजच्या वारसदारांचे दुर्दैव. महाराष्ट्रातील एक मस्तवाल हैदोस थांबला असून आता शुभ घडेल, असेही अग्रलेखात म्हटले आहे.