पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपने अजित पवारांच्या रूपाने टोणगा गोठ्यात बांधला, सेनेचा घणाघात

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस

भाजपने अजित पवार यांना हाताशी घेऊन सरकार स्थापन केले आहे. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने भाजप आणि अजित पवार यांच्यावर घणाघाती शब्दांत टीका केली आहे. भाजपने महाराष्ट्राची सत्ता मिळवण्यासाठी तत्त्व, नीतिमत्ता गुंडाळून ठेवली आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला व तळाला जाण्याची तयारी आहे. त्यांना विधानसभेत बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. भाजपास आता बहुमत मिळणे म्हणजे टोणग्याने दूध देण्यासारखे आहे. अजित पवारांच्या रूपाने त्यांनी एक टोणगा गोठ्यात आणून बांधला आहे व टोणग्याचे दूध काढण्यासाठी ‘ऑपरेशन कमळ’ योजना आखली आहे, असा टोला लगावला. देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पक्षाने मुंडके गाढवाचे व धड रेड्याचे असा प्रकार महाराष्ट्राच्या माथी मारला आहे. अजित पवारांना तुरुंगात धाडण्याची भाषा करणारे आता फडणवीस, अजित पवार आगे बढोच्या घोषणा देत होते. पण महाराष्ट्राची जनता अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा देत असल्याची टीका शिवसेनेने 'सामना' या आपल्या मुखपत्रातून केली आहे.

१३ अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या १६ आमदारांवर नजर

काय म्हटलंय शिवसेनेनं...

आम्ही भाजपच्या भामटेगिरीस आणि टोणगेशाहीस शुभेच्छा देत आहोत. आज राज्यात सर्वत्र भाजपची छीः-थू होत आहे. टोणग्याचे शेण भाजपच्या स्वच्छ, पारदर्शक वगैरे चेहऱ्यावर उडाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील अस्वस्थ झाले असावेत. राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवार हे पंचवीस-तीस आमदार घेऊन भाजपच्या गोठ्यात येतील या भ्रमात फडणवीस व त्यांचे मंडळ होते. अजित पवार यांचे कथित बंड वाळूवर गाढवाने मुतावे व थोडी फसफस व्हावी तसे फसले आहे. हातात सत्ता आहे, तपास यंत्रणा आहेत, भरपूर काळा पैसा आहे, त्या जोरावर राजकारणात हवा तो उन्माद घडवू शकतो असे कुणाला वाटत असेल तर शिवरायांच्या महाराष्ट्राचा तो अपमान आहे. मुळात महाराष्ट्रावर हे जे राजकीय अस्थिरतेचे सावट पसरले आहे ते भारतीय जनता पक्षामुळे, त्यांच्या व्यापारी वृत्तीमुळे आणि फसवणुकीच्या कलेमुळे. आधी त्यांनी शिवसेनेसारखा मित्र गमावला व आता एखाद्या अट्टल चोराप्रमाणे रात्रीच्या अंधारात अपराध करीत आहेत. सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून राज्यपालांकडून भाजपास सरकार स्थापनेची संधी होती.

देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यात 'वर्षा'वर खलबतं

इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी हा काळा दिवस वगैरे पाळण्याचे ढोंग आता भाजपवाल्यांनी करू नये. राष्ट्रपती भवन, राजभवनाचा इतका गैरवापर देशात त्या काळातही झाला नव्हता. महाराष्ट्र नीट जागा झाला नसताना भल्या सकाळीच फडणवीस व अजित पवार यांनी राजभवनात जाऊन शपथ घेतली. ते बहुधा आंघोळ न करताच पाहोचले असतील; पण राजभवनात सगळय़ांनी लोकशाहीच्या नावाने आंघोळ केली. सर्व संकेत धाब्यावर बसवून एखाद्या भामटय़ा, परागंदा झालेल्या चोराप्रमाणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. या सोहळय़ास स्वतःचे पै-पाहुणे तर सोडाच, पण परंपरेप्रमाणे अधिकारीवर्गदेखील हजर नव्हता. राज्यपाल एरवी आमदारांची पत्रे, त्यांच्या सह्या वगैरेची शहानिशा केल्याशिवाय सत्तास्थापनेचे आमंत्रण देत नाहीत. शिवसेनेच्या बाबतीत ते घडले आहे, पण अजित पवार पक्ष कार्यालयातून चोरलेले सह्यांचे पत्र राज्यपालांना दाखवतात व राज्यपाल त्या कागदांवर विश्वास ठेवून फडणवीस व अजित पवारांना शपथ देतात. हा प्रकार म्हणजे हेराफेरीचा कळस आहे. निर्लज्जपणा असे शब्द वापरून आम्हाला या संस्थांचा अपमान करायचा नाही. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांचे येणारे सरकार नैतिक की अनैतिक हा विषय सोडा, पण देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पक्षाने काय जन्मास घातले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:shiv sena slams on bjp devendra fadnavis ajit pawar for government formation in maharashtra