पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एनडीएच्या बैठकीला शिवसेना जाणार नाहीः संजय राऊत

संजय राऊत

महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्यावरुन भाजप-शिवसेनामध्ये वितुष्ठ निर्माण झाले आहे. भाजपने मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळवून घेत सत्ता स्थापण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. दरम्यानच्या काळात शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दोन्ही पक्षांनी अजूनही युती तुटल्याचे स्पष्टपणे जाहीर केले नसले तरी त्यांनी कृतीद्वारे युती संपुष्टात आल्याचे दाखवून दिले आहे. दरम्यान, शिवसेनेने आता रविवारी दिल्ली येथे आयोजित एनडीएच्या बैठकीला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. शिवसेना एनडीएच्या बैठकाला जाणार नसल्याचे ते म्हणाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगत सर्वकाही ठीकठाक असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.

रजत शर्मांनी DDCAच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला

दरम्यान, भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची आणि इतर संघटनात्मक रचनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक गेले दोन दिवस मुंबईत सुरू आहे. शनिवारी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप उमेदवारांची एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत नेमके काय घडले, याची माहिती पत्रकारांना देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख माननीय मुख्यमंत्री असाच केला. वास्तविक देवेंद्र फडणवीस यांनी ८ नोव्हेंबरलाच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर गेल्या मंगळवारी, १२ नोव्हेंबरला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे आता माजी मुख्यमंत्री झाले आहेत, याचा विसर चंद्रकांत पाटील यांना पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.