पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेचा वचननामा जाहीर, १ रुपयांत आरोग्य चाचणी, शेतकऱ्यांना कर्जमाफी

शिवसेनेचा वचननामा जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पक्षाचा वचननामा जाहीर केला. १० रुपयांत जेवण, १ रुपयांत आरोग्य चाचणी, शेतकऱ्यांना कर्जमाफी, खेड्यातील मुलांसाठी विशेष वाहतूक सेवा अशी अनेक आश्वासनं महाराष्ट्राच्या जनतेस देण्यात आली.

पंजाबमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा, सुरक्षाव्यवस्था कडक

१० रुपयांत चांगलं सकस जेवण  राज्यात उपलब्ध करून  देण्यात येईल. महिला बचत गटांतील महिलांना यामध्ये सामावून घेतलं जाईल असं शिवसेनेनं आपल्या वचननाम्यात म्हटलं आहे. २०० प्राथमिक आरोग्य चाचण्या या केवळ १ रुपयांत उपलब्ध होणार आहेत. अनेक आरोग्य चाचण्यांचा खर्च हा सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर आहे त्यामुळे अत्यल्प किमतीत चाचण्या उपलब्ध करुन देण्याचं वचन शिवसेनेनं सामान्य नागरिकांना दिलं आहे. 

..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास

याव्यतिरिक्त घरगुती वापरातील वीजेसाठी ३०० युनिटपर्यंत ३० टक्क्यांनी दर कमी करण्याचं  आणि खेड्यापाड्यातील  शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याचं आश्वसान देण्यात आलं आहे.  महाराष्ट्राच्या शेतकऱ्यास कर्जमाफी, खतं, बिणाये यांची किंमत स्थिर ठेवण्याचं वचन सेनेच्या वचनाम्यात देण्यात आलं आहे.

राज्याच्या तिरोजीवर अतिरिक्त भार पडणार नाही याची काळजी  घेऊनचं हा वचननामा तयार करण्यात आला आहे, पूर्णपणे जबाबदारीने हा वचननामा आखलेला आहे. यातलं एकही वचन खोटं ठरणारं नाही. यात दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता आम्ही करू असं उद्धव ठाकरे यावेळी  म्हणाले.