पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिव वडापाव नाही तर खमंग ढोकळा घ्या; आदित्य ठाकरेंवर टीकेची झोड

आदित्य ठाकरे

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यासाठी ते जोरदार तयारीला सुध्दा लागले आहे. वरळी विधानसभा मतदार संघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ठाकरे घरण्यातून आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी आदित्य ठाकरेंनी आपल्या मतदार संघामध्ये बॅनर्स लावले आहेत. हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

आदित्य ठाकरे यांचा भलामोठा फोटो आणि त्यावर वेगवेगळ्या भाषेमध्ये 'नमस्ते वरळी' असे लिहिले आहे. हिंदी, मराठी, गुजराती, उर्दू, तमिळ भाषेमध्ये हे बॅनर्स लावण्यात आले आहे. या बॅनर्सवरुन आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. आदित्य ठाकरे यांच्या गुजरातीमधील बॅनरवरुन सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड सुरु आहे. हाच का शिवसेनेचा मराठी बाणा असा सवाल विचारण्यात येत आहे. 

 

मराठी मराठी करणाऱ्या शिवसेनेने मतांसाठी इतर भाषांचा आधार घेतला असल्याची टीका सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे. 'आता शिव वडापाव नाही तर खमंग ढोकळा घ्या! गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी गुजराती भाषेचा आधार घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यांना वडापाव ऐवजी खमंग ढोकळा दिला जाईल.' अशी फेसबुक पोस्ट करत एकाने तर मराठी भाषेसाठी आग्रही असलेल्या शिवसेनेचा समाचार घेतला आहे.